एकमेव साक्षीदार – भाग 07
साकेत त्याच्यासममोर हात जोडत म्हणला, “मी जे सांगतोय ते प्लीज एकदा नीट ऐकून घे!” हॉट रॉकीने मान हलवून संमती दिली आणि साकेत बोलू लागला. “काही दिवसांपूर्वी माझी एका व्यक्तीशी ओळख झाली होती. विजय त्याच नाव. सुरवातीला आमची होणारी भेट हा एक योगायोग वाटत होता. पण जेव्हा तो दिग्दर्शक मला म्हणाला की, “तुला फक्त एकाच कारणामुळे त्या सीन मध्ये आणि चित्रपटामध्ये तुला काम दिल, ते म्हणजे तु गे आहेस म्हणून!” त्यावेळी विजय तिथे होता. तेव्हा पासून त्याची आणि माझी भेट होत गेली. मित्राकडे घराची चौकशी करताना देखील तो माझ्या समोर होता. कदाचित तो माझा पाठलाग करत करत तो माझ्या अभिनय शिकवणार्या क्लास मध्ये आला आणि माझ्या समोर मदतीचा हात समोर केला …