नंदा काकी 1
साधारण मी ८-९ वर्षांचा असेन तेव्हा नंदिनी उर्फ नंदा लग्न होऊन आमच्या घरी आली. तसे पाहिलं तर ती काही माझी सख्ख्या चुलत्याची बायको नाही तर चुलत चुलत्याची ! पण सख्खी किंवा चुलत कशी का असेना चुलती तर होती ! लग्नाच्या वेळी तिचे वय असेल १८-१९ च्या आसपास. तसं पाहीलं तर माझा चुलत चुलता हा गावीच रहात होता. तिकडेच तो एका सरकरी कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यामुळे नंदा देखील गावीच असायची. आमची भेट हि सणासुदीला म्हणजे या उन्हाळ्यात ते त्या उन्हाळ्यात अशी घडायची. साधारणतः एक पद्धत आहे कि, मामा – मामी जितके जवळचे तितकेच चुलता – चुलती दूरचे ! याचे कारण काय महिती नाही पण मामला एकेरी नावाने सर्वजन हाका …