सूड १० (अंतिम भाग) – Marathi Sex Story
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुषमाने सगळी आवराआवर केली. नाष्टा – पाणी आवरुन दिनकररावाना जेवणाचा डबा बनवून दिला. दिनकरराव निघून गेल्यावर उरलेली कामे तिने पटापट आवरली. दुपारच्या वेळी थोडं आराम घ्यावा म्हणून ती आडवं पडायला गेली आणि विराबद्दल तिच्या डोक्यात विचार डोकावून गेला. आपल्या नवऱ्याच्या शरीरात त्याला प्रवेश करायची परवानगी देऊन आपण काही चूक तर केली नाही ना? असा विचार जणू तिची झोपेची तंद्री उडवून गेला. तिला मनातच काही प्रश्न पडत गेले, ज्याचा उलगडा स्वतः विराच करु शकत होता.. पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तिला आता मध्यरात्रीची वाट बघण्याशिवाय पर्यायच नव्हता.बाहेर कुणाच्यातरी बोलण्याचा आवाज आला म्हणून तिने सहज दारातून बाहेर डोकावलं…तर काकू लंगडत हळूहळू चाललेली. तिच्याकडे बघून सुषमाला विचार पडला की, ही …