येडा भोका चा – भाग 4 (अंतिम)
एक गंमत आहे माहीत आहे का तुला” मी म्हणाले “काय हो” साठे आजोबा म्हणाले “अग मालती, याला स्मृती भ्रम आहे” मी म्हणाले “म्हणजे क्या हो” साठे आजोबा म्हणाले “अग त्याला सकाळची गोष्ट दुपारी आणि दुपारची गोष्ट रात्री लक्ष्यात राहत नाही, अग म्हणजे दुपारी जर तू त्याला एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती तो रात्री करू शकत नाही विसरून जातो, स्मृती भ्रम असल्यामुळे तो दुसऱ्यांना सुधा सांगू शकत नाही” तवढ्यात साठे वहिनी म्हणाल्या “चला जेऊन घेऊ” साठे आजोबा आणि आजींनी भरपूर आग्रह केला म्हणून मी ही जेवली त्यांच्या कडे, मुक्या ही जेवला. आता माझं लक्ष्य घड्याळाकडे गेल बघितल तर दहा वाजले होते. मी म्हणाले “अग बाई! दहा वाजले चला मी निघते” …